‘संवेदना ‘ – सहवेदना या शब्दाजवळ जाणारी हि भावना . एखादी कल्पना सुचणे अन त्यावर सुरवात करणे , छोटी गोष्ट आहे. परंतु ती अखंड निभावणं खूपच मोठी गोष्ट आहे . डॉ दिलीप शिंदे यांच्या वैद्यकीय जाणिवतेपेक्षाही त्यांच्यातील सहृदयता व सेवाभाव मोठा ठरला आहे . एका सक्षम नेतृत्वामुळे संपूर्ण टीम कशी झपाटून काम करून दाखवू शकते ,याचे हे उत्तम उदाहरण. सेवेमधील आनंद फार जणांना घेता येत नाही.
तो भगवंत अनेकांना दिसत नाही . तो डॉ . दिलीप शिंदे अन त्यांच्या सहकार्यांना दिसलाय याचे कौतुकच आहे . वैद्यकीय पेशात पैशाबरोबरच जो प्रचंड सन्मान मिळतो त्यास खचितच पात्र आहेत . पुढील वाटचालीस मनः पूर्वक शुभेच्छा !
-डॉ मिलिंद किल्लेदार
अनुराधा नेत्र रुग्णालय ,
सांगली (१७ जुलै २०१७)