वास्तव स्विकारुन उचललेलं पाऊल

संवेदना शुश्रूषा केंद्रासारखे उपक्रम सध्या काळाची गरज बनले आहेत . आपल्या समाजामध्ये परंपरांगतता आणि वर्तमानातले वास्तव याविषयी एक प्रचंड मोठा झगडा आहे . परंपरा ही आपल्याला सामाजिक आणि कौटुंबिक जुन्या वळणापासून दूर जाऊ देत नाही आणि वर्तमानातले वास्तव इतके भीषण असते कि आपल्यातला मानसिकतेतील व्यर्थता आपल्याला जाणवू देत नाही .

जोपर्यंत या समाजामध्ये संयुक्त कुटुंबपद्धती होती आणि कुटुंबात अनेक माणसे राहात होती ,
तोपर्यंत वृद्धांची सेवा शुश्रूषा आपोआप होत होती. आता संयुक्त कुटुंबाची जागा छोट्या कुटुंबाने घेतली आहे. त्यामुळे घरोघरी वृद्धांच्या सेवा शुश्रुषेचा प्रश्न भेडसावू लागला आहे . वर्तमानातल्या वास्तवाला स्विकारुन आपण हे जे पाऊल टाकले आहे त्याचे मी मनापासून स्वागत करतो .

– सुरेश द्वादशीवार
ज्येष्ठ पत्रकार व लेखक ,नागपूर
३१ मे २०१८