ढासळत्या समाजमनाची जपलेली संवेदना

पहिल्या मजल्याच्या विस्तारीत बांधकामाच्या निमित्ताने संवेदना शुश्रूषा केंद्राचा जवळून अनुभव आला . डॉ . दिलीप शिंदे व सर्व टीम ने खरोखरच ढासळत्या समाजमनाच्या संवेदना जपण्याचे अवर्णनीय काम निष्ठेने सुरु ठेवले आहे . पाळण्यातील लहान मूल व अंथरुणाला खिळलेली वयस्कर माणसं सारखीच असतात ,याचा प्रत्यय केंद्रात सतत जाणवला . 

केंद्र वाढत असताना चांगला स्टाफ ,व्यवस्था ,वाढीव बांधकाम ,कायदेशीर बाबी अशा अनेक गोष्टी काळानुरूप उलगडत चालल्या आहेतच. पण यात डॉ . शिंदे व टीम हसतमुखाने हे शिवधनुष्य पेलत आहेत . हे तितकेच खरे आहे . या सगळ्यांची ,कार्यांची समाजानेही नोंद घेऊन आपापल्या परीने सहभागी झालं पाहिजे , असं वाटतं .

-आर्कि .अतुल कोगनोळे
सांगली (७ ऑगस्ट २०१८)