निर्मळ सेवावरती ….

माझे वडील स्व . सै नामदेवराव कराडकर यांच्या स्मृतिदिनी समाजातील विविध क्षेत्रात प्रामाणिक तळमळीने काम करणाऱ्या ,
एखाद्या तरुण व्यक्तीला स्वातंत्र्यसैनिक , नामदेवराव कराडकर स्मृती निमित्त ” सेवारती ” पुरस्कार देण्याचं आम्ही भावंडानी निश्चित केले आणि क्षणार्धात या पहिल्या पुरस्कारासाठी माझ्या डोळ्यासमोर डॉ . दिलीप शिंदे यांचे नाव तरळले .

त्यांची प्रामाणिक तळमळ आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता साधेपणाने पण ठामपणाने छोटी छोटी चांगली काम पुढं नेण्याची वृत्ती मला नेहमीच भावत आली आहे. त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता सुरु केलेलं संवेदना शुश्रूषा केंद्र हे सर्वार्थानं सेवाभावी काम आहे. या कामात त्यांच्या पत्नी डॉ . सौ .नीलम शिंदे ,
सर्व विश्वस्त मंडळी व कर्मचारी वर्ग तितक्याच तळमळीने सहभागी असतात . बुजुर्गांच्या जेवणातील वेदनांची आनंदीफुले बनविण्याच्या त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्या

-महेश कराडकर
संपादक ,चतुरंग अन्वय
(२० जानेवारी २०१७)